राज्यभरातील विविध कार्यशाळा, बैठका, स्थळपहाणी, इत्यादींचा तपशील व छायाचित्रे
जिल्हास्तरीय वनहक्क समिती गोंदिया सभा : दिनांक १४ डिसेंबर २०१८
जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सभा दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय वनहक्क समिती डॉ.कादंबरी बलकवडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली .सदर सभेत ३९ नियमित वनहक्क दाव्यांवर निर्णय घेण्यात आला. आयोजित सभेत मा.हरीश धार्मिक सर उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा सचिव जिल्हास्तरीय वनहक्क समिती व अशासकीय सदस्य, त्याचप्रमाणे श्री.केशव मिश्रा, जिल्हा समन्वक, जिल्हा व्यवस्थापक श्री.अविनाश सेटीये, तालुका व्यवस्थापक जिजा फरकाडे, उपविभाग देवरी, श्री.गुरनुले समन्वक उपविभाग अर्जुनी मोरगाव, तथा सहाय्यक समन्वक श्री.मोहन लंजे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय वनहक्क समिती गोंदिया सभा : दिनांक १९ ऑक्टोबर २०१८
दिनांक १९ आक्टोंबर २०१८ रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सभा मा. डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय वनहक्क समिती, गोंदिया, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेत ३२ नियमित दावे व २५ अपील प्रकरणे निर्णयासाठी ठेवण्यात आली. ३२ नियमित प्रकरणावर निर्णय घेण्यात आला. आयोजित सभेत मा. हरीश धार्मिक, उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा सचिव, जिल्हा स्तरीय वनहक्क समिती, श्री.शेंडे, सदस्य, जिल्हास्तरीय वनहक्क समिती, व सर्व मा. अशासकीय सदस्य उपस्थित होते.
सदर सभेत जिल्हा समन्वयक श्री.केशव मिश्रा, जिल्हा व्यवस्थापक श्री.अविनाश सेटीये, व सहाय्यक समन्वयक श्री.मोहन लंजे उपस्थित होते.
जिल्हा स्तरीय वनहक्क समिती गोंदिया सभा : दिनांक २० ऑगस्ट २०१८
दिनांक २० ऑंगस्ट २०१८ रोजी जिल्हा स्तरीय वनहक्क समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे मा.जिल्हाधिकारी श्री.अशोक लटारे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर सभेत ५४ वैयक्तिक दावे व १४८ वैयक्तिक अपील दावे प्रकरणात निर्णय घेण्यात आला.
सदर सभेत मा.शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा सदस्य सचिव जिल्हा स्तरीय वनहक्क समिती, मा.श्री.युवराज सर उपवनसंरक्षक तथा सदस्य जिल्हा स्तरीय वनहक्क समिती, अशासकीय सदस्य जिल्हा स्तरीय वनहक्क समिती, त्याचप्रमाणे मा. प्रवीण जमदाडे सहाय्यक अधिक्षक, जिल्हा समन्वयक श्री.केशव मिश्रा, जिल्हा व्यवस्थापक श्री.अविनाश सेटीये व सहाय्यक श्री.मोहन लंजे उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रम, अहमदनगर : १ जुलै २०१८
अहमदनगर जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम वडगाव सवताल, ता. पारनेर, जिल्हा. अहमदनगर, येथे झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. श्री. राम शिंदे, जिल्हाधिकारी श्री. राहुल द्विवेदी, आमदार श्री. कर्डिले, उपवनसंरक्षक श्री. आदर्श रेड्डी, व महसूल व वनविभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एकूण ५०० झाडे लावण्यात आली. सदर कार्यक्रमास वनहक्क कक्ष मधील श्री. एस. आर. खान, जिल्हा समन्वयक, श्री. सुनील भालेराव, लिपिक, कु. ज्योती वायभासे, श्री. भानू जोग हेही उपस्थित होते.
मौजे धामणडोह, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद
दिनांक २७ जून २०१८ रोजी CFR बाबत मौजे धामणडोह, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथे मा. श्रीमंत हारकर, उपविभागीय अधिकारी कन्नड, श्री. सुधाकर, तहसीलदार कन्नड, श्री. वरुडे, सहाय्यक वन संरक्षक, तलाठी, मंडल अधिकारी, वन कर्मचारी, पंशायात समिती सदस्य, ग्रामसेवक, गावकरी, यांच्यासह स्थळपाहणी करण्यात आली. त्यावेळी उपस्थित सर्व अधिकारी तसेच उपविभागीय समन्वयक अभिजीत पानट यांनी उपस्थितांना CFR बाबत माहिती सांगितली.