accordion menu joomla

सुस्वागतम

आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत व सक्षम प्रतिनिधींनी अस्वीकृत वन हक्क कायद्याच्या वैयक्तिक व सामूहिक दाव्यांच्या / अपिलांच्या पडताळणीसाठी एक प्रश्नावली भरणे आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, यांनी या पोर्टलद्वारे डिजिटल सर्वेक्षण व्यवस्था पुरवली आहे. या पोर्टलचा वापर करण्यासाठी अधिकृत वापरकर्त्यांना लॉग इन करावे लागेल. त्यासाठी आधी या पोर्टलवर आपले खाते तयार करणे आवश्यक आहे.

 

या पोर्टलवर आपले खाते तयार करण्याचे टप्पे :-

  1. स्क्रीनवर आपल्या उजव्या भागामध्ये उपलब्ध असलेल्या "आपले नवे खाते तयार करा" या लिंकवर क्लिक करा. त्यापुढे येणा-या फॉर्ममध्ये आवश्यक तो तपशील भरून सबमिट करा.
  2. आपले नवे खाते तयार करण्याची प्रक्रिया सुरु होईल. प्रथम आपला ई-मेल आयडी पडताळून पाहण्यासाठी आपल्याला तश्या अर्थाची पहिली मेल येईल.
  3. मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला ई-मेल आयडी कन्फर्म करा.
  4. त्यानंतर आपले नवीन खाते प्रशासकाच्या संमतीसाठी ठेवण्यात येईल. प्रशासक आपला तपशील पडताळून पाहून आणि आपण अधिकृत वापरकर्ते असल्याची खात्री करून आपले खाते अॅक्टीव्हेट करतील. आपले खाते अॅक्टीव्हेट झाल्यावर आपल्याला तश्या अर्थाची दुसरी मेल येईल.
  5. त्यानंतर आपण या पोर्टलचे अधिकृत वापरकर्ते व्हाल आणि आपल्याला लॉग इन करता येईल. लॉग इन केल्याशिवाय पुढील कोणत्याही प्रक्रिया करता येणार नाहीत.
  6. नवीन खाते तयार करणे ही केवळ एकदाच करण्याची प्रक्रिया आहे. खाते कार्यान्वित झाल्यावर आपण पुढच्या वेळेपासून थेट लॉग इन करू शकाल.
  7. काही कारणाने आपले युजरनेम किंवा आपला पासवर्ड, किंवा दोन्ही विसरल्यास स्क्रीनवर आपल्या उजव्या भागातील "युजरनेम किंवा पासवर्ड विसरलात?" या लिंकवर क्लिक करून आपले युजरनेम मेलद्वारे जाणून घेऊ शकाल, तसेच आपला पासवर्डही रिसेट करू शकाल.









© 2024 - Tribal Research and Training Institute (TRTI), Pune. All rights reserved. Developed and maintained by TRTI.